नागपूर,
summer schedule flight services नागपूर विमानतळाचे २०२६ सालचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या नवीन वेळापत्रकानुसार नागपूर विमानतळावरुन हवाई सेवांमध्ये काही प्रमाणात वाढ होणार आहे. विविध विमान कंपन्यांनी काही नवीन विमानसेवा जाहीर केल्या आहेत, तर काही विमानसेवांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे. तथापि, अजूनही कोणत्याही नवीन शहरांशी थेट कनेक्टिव्हिटी नाही.
प्रमुख शहरांसाठी विमान सेवेचे पर्याय
इंडिगो एअरलाइन्सनेही नागपूरहून पुण्याला दोन नवीन विमानसेवा जाहीर केल्या आहेत. याव्यतिरिक्त, मुंबई, बंगळूरु, हैदराबाद आणि अहमदाबादसाठीच्या विमानसेवा वाढवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांना या प्रमुख शहरांसाठी अधिक विमान सेवेचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसने नागपूरहून बंगळूरुसाठी नवीन विमानसेवा जाहीर केल्या आहेत. यामुळे बंगळूरुच्या आयटी हबला जाणार्या प्रवाशांना अतिरिक्त पर्याय उपलब्ध होतील आणि दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक सुविधाजनक होईल.
विमानसेवेच्या वेळात बदल
स्टार एअरने नागपूरहून नांदेड आणि कोल्हापूरसाठी नवीन विमानसेवा जाहीर केली आहे. नवीन वेळापत्रकामुळे काही विद्यमान विमानसेवांच्या वेळाही बदलल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांना त्यानुसार आपल्या प्रवासाचे करावे लागेल. नागपूरहून इतर प्रमुख शहरांसाठी नव्या विमानसेवांची मागणी होती.summer schedule flight services मात्र २०२६ च्या उन्हाळी वेळापत्रकात कोणत्याही थेट विमानसेवेचा समावेश करण्यात न आल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.