पश्चिम आशिया संकटावर सर्वपक्षीय बैठक, केंद्र सरकार सतर्क!

25 Mar 2026 19:09:13
नवी दिल्ली,
all-party-meeting : पश्चिम आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
 
 
 
JKL
 
 
या बैठकीत विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी होऊन देशाची भूमिका आणि पुढील धोरणावर चर्चा करणार आहेत. वाढत्या युद्धस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा पुरवठा आणि भारताच्या हितांवर परिणाम होत असल्याने केंद्र सरकार सजग झाले आहे.
 
पंतप्रधानांनी यापूर्वी संसदेतही या परिस्थितीची माहिती देत संवाद आणि शांततेचा मार्गच योग्य असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, इंधन, गॅस आणि पुरवठा साखळीवर होणाऱ्या परिणामांचा सामना करण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे.
दरम्यान, पश्चिम आशियातील संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापार मार्गांवर परिणाम झाला असून, त्याचा थेट परिणाम जागतिक तेल-गॅस पुरवठ्यावर होत आहे. त्यामुळे भारतासह अनेक देश चिंतेत आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0