दोन पश्चिमी विक्षोभांचा परिणाम, देशात पावसाचा इशारा!

25 Mar 2026 20:28:01
नवी दिल्ली,
western-disturbance-rain-warning : देशभरातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) पावसाचा इशारा दिला आहे. दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स (पश्चिमी विक्षोभ) भारतावर परिणाम करणार असल्याने अनेक भागांत पाऊस, वादळे आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
 
 
 
RAIN
 
 
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर भारतासह पश्चिम हिमालयीन भागात २४ ते २७ मार्चदरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गडगडाट, वीज आणि जोरदार वाऱ्यासह हवामान बदलू शकते. या बदलत्या हवामानामुळे तापमानातही चढ-उतार दिसून येणार आहे. काही भागांत उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळेल, तर काही ठिकाणी वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
 
दरम्यान, उत्तर भारतात आधीच अवकाळी पाऊस आणि वादळामुळे वातावरणात गारवा जाणवत असून, पुढील काही दिवसांत अशाच परिस्थितीचा परिणाम देशातील इतर भागांवरही होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0