महावीर पाणपोई उपक्रमाचे भव्य उद्घाटन

25 Mar 2026 20:03:00
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
mahavir-water-supply-initiative : भगवान महावीर जन्मकल्याणकाच्या पावन निमित्ताने महावीर युवक मंडळ व जोश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथील पोस्ट ऑफिस परिसरात महावीर पाणपोई या सेवाभावी प्रकल्पाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. समाजहिताचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
 

y25March-Mahaveer 
 
 
 
या उद्घाटनप्रसंगी जैन समाजाचे आधारस्तंभ किशोर दर्डा, आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी भारतीय जैन संघटना यवतमाळ अध्यक्ष उमेश बैद, सचिव संदीप कोचर, श्याम भन्साली, जैन सेवा समितीचे अध्यक्ष महावीर भन्साली, उपाध्यक्ष विजय कोटेचा व कस्तुर सेठिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
 
कार्यक्रमादरम्यान किशोर दर्डा, आ. बाळासाहेब मांगुळकर, सीमा दर्डा, महावीर भन्साली, उमेश बैद, वनिता भरूट, शारदा गांधी, श्याम भन्साली आणि महावीर जन्मकल्याणक 2026 चे प्रकल्प अधिकारी दीपक बोरा यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी जैन समाजातील ज्येष्ठ सदस्य अमरचंद गुगलिया यांनी यावेळी, पाणी देणे हे नऊ प्रकारच्या पुण्यांपैकी एक महत्त्वाचे पुण्य आहे, असे सांगत या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. किशोर दर्डा यांनीही या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत जैन समाजाच्या परोपकारी परंपरेचा उल्लेख केला.
 
 
कार्यक्रमास जैन समाजातील महिला वर्गाचीही उत्स्फूर्त उपस्थिती होती. चंदा खाबिया, प्रियंका तातेड, पूजा गुगलिया, वंदना बोरुंदिया, वनिता भरुट, शारदा गांधी, हर्षिता कुचेरिया यांच्यासह अनेक महिलांनी सहभाग नोंदविला.
 
 
तसेच विजय बुंदेला, संतोष गादिया, राजेंद्र गुगलिया, राजेंद्र गेलडा, प्रशांत दर्डा, संजय गुगलिया, रमेश खिवसरा, गिरीश खंदेडिया, सुमती कोठारी, दर्शन खिवसरा, नितीन खिवसरा यांच्यासह जैन समाजातील अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या.
महावीर युवक मंडळ व जोश फाऊंडेशनचे अध्यक्ष समर्पण गांधी यांच्या नेतृत्वात उन्हाळ्याच्या कडक तापमानात महावीर पाणपोई हा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरणार असून, समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0