यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोलसाठी ‘झुंबड’

26 Mar 2026 20:23:26
यवतमाळ, 
Petrol shortage जागतिक स्तरावर ढग गडद होत असतानाच ‘इंधनाचा पुरवठा थांबणार’ या वार्‍यासार‘या पसरलेल्या अफवेने यवतमाळ शहरात नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केली. त्यामुळे शहरातील काही पेट्रोलपंप बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील दिग्रस, घाटंजी तालुक्यातसुद्धा पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केल्याने या ठिकाणचे पेट्रोल पंपसुद्धा बंद झाले आहेत. तर उमरखेड येथे शहरात सध्या पेट्रोल, आणि गॅस टंचाईबाबत सोशल मिडियावरील अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ‘माचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
p-1
 
शहरात सध्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस टंचाईबाबत सोशल मिडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ‘माचे वातावरण निर्माण झाले आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा भासेल, अशा संदेशांमुळे वाहन चालक मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पंपांवर गर्दी करत शहरातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक जण आपल्या वाहनांसोबतच रिकाम्या कॅनमध्येही पेट्रोल-डिझेल साठवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
 

p-२  
 
Petrol shortage याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी अमोल महाजन यांनी स्पष्ट केले की, सध्या कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नाही आणि पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी विश्वास न ठेवता विनाकारण पंपांवर गर्दी करू नये. उमरखेड शहरातील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपाचे चालक कृष्णा देवसरकर यांनीही पेट्रोल आणि डिझेलचा पर्याप्त साठा उपलब्ध असल्याचे सांगितले. ग‘ाहकांनी घाबरून जादा इंधन खरेदी करण्याऐवजी संयम राखावा, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, देवसरकर पेट्रोलियम, सारडा पेट्रोलियम तसेच गावाबाहेरील पटेल, दिघेवार, कोडगिरवार आणि विडूळ पेट्रोल पंपांवरही मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सोशल मिडिया संदेशांवर विश्वास ठेवून नागरिक मोठ्या प्रमाणावर इंधन भरण्यासाठी धाव घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.
‘साहेब’ कुठे आहे पेट्रोल ?
यवतमाळ शहरातील काही पेट्रोलपंप बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहनात पेट्रोल भरण्यासाठी शहरात दारव्हा मार्ग, रोड, दत्त चौक यासह इतर ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर जावे लागत आहे. मात्र, तेही पेट्रोल पंप बंद असल्याने साहेब कुठे आहे पेट्रोल, असे विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
साठा असूनही बंद
प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांपासून दूर राहावे आणि कोणतीही अधिकृत माहिती असल्यास विश्वासार्ह मानावी. काही पेट्रोल पंपवाल्यांनी तर साठा असतानाही सुरक्षेच्या कारणाखाली आपले पंप बंद ठेवले असल्याची माहिती आहे. प्रशासनाने सर्वच पंपांची साठा तपासणी करून, त्यांना आवश्यक सुरक्षा पुरवून ते पंप चालू करवून घेण्याची गरज आहे.
Powered By Sangraha 9.0