आजपासून भव्य ‘यवतमाळ महोत्सव’

26 Mar 2026 20:33:27
कृषी महोत्सव, पशुप्रदर्शन, समृद्धी सरस प्रदर्शन, सांस्कृतिक महोत्सव,
नवतेजस्विनी प्रदर्शन, योजनांचे प्रदर्शन, ग्रंथोत्सव

यवतमाळ, 
राज्य शासनाच्या विविध विभागांच्या जिल्हास्तर कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३१ मार्च दरम्यान कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्र (वाघापूर) येथे भव्य ‘Yavatmal Festival 2026’  ‘यवतमाळ महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या सं‘येने सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पत्रपरिषदेत केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय आणि नगर यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 

mhotsav
 
या महोत्सवाचे उद्घाटन शुक‘वार, २७ मार्च रोजी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या यवतमाळ महोत्सवात कृषी महोत्सव, पशुप्रदर्शन, समृद्धी सरस प्रदर्शन, सांस्कृतिक महोत्सव, नवतेजस्विनी प्रदर्शन, शासकीय योजनांच्या माहितीचे प्रदर्शन आणि ग्रंथोत्सवाचा समावेश आहे. या कार्यक‘माला आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
 
 
 
‘Yavatmal Festival 2026’ तसेच खासदार संजय देशमुख, खा. प्रतिभा धानोरकर, खा. नागेश आष्टीकर, आमदार भावना गवळी, आ. किरण सरनाईक, आ. धीरज लिंगाडे, आ. राजू तोडसाम, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. संजय देरकर, आ. किसन वानखेडे, यवतमाळ नगर परिषदेच्या अध्यक्ष अ‍ॅड. उईके, उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी, जिल्हाधिकारी विकास मीना, मु‘य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह विविध विभागांचे अमरावती विभागीय अधिकारी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या यवतमाळ महोत्सवात कृषी विभागाला २०० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. याकरिता एकूण ८ डोमची उभारणी करण्यात येणार आहे. या डोममध्ये शासकीय दालने, चर्चासत्रे व विविध स्पर्धांसाठी सेमिनार हॉल, कृषी निविष्ठा दालने, महिला बचतगटांचा फूड झोन, खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू आणि माविम बचतगट व सेंद्रीय शेती, धान्य विक‘ी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय दालन असणार आहेत.
Powered By Sangraha 9.0