हभप प्रल्हाद अस्वार
तुलसी रामायण कथा अखंड हरिनाम सप्ताह
संग्रामपूर प्रतिनिधी
Akhand Tulsi Ramayana Katha वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विसाव्या शतकात होऊन गेलेला असा संत ज्या संताने बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक व्यवस्थेस जगण्याचा वास्तव मंत्र दिला व समाजाला विश्वबंधुत्वाची शिकवण दिली असल्याने तुकडोजी महाराजांचे विचार हे सार्वकालिक, सोपे, समन्वयवादी व अखिल समाजाचे कल्याण करणारे आहे. समाजातल्या प्रत्येक माणसाने ते अंगिकारण्याचा प्रयत्न केला तर अखिल समाजाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.
आजच्या या कठीण प्रसन्गताची राष्ट्रासनतचे विचार हे नवी प्रेरणा व नवी जाणीव देते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज आहे असे प्रतिपादन आपल्या कीर्तनातून हभप प्रल्हाद अस्वार यांनी संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील श्रीराम मंदिरात दि.२३ रोजी पासून आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय तुलसी रामायण कथा अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम प्रसंगी सोमवार रोजी रात्री कीर्तनातून सांगत होते .
Akhand Tulsi Ramayana Katha संताने विश्वात असलेले सामाजिक, धार्मिक प्रस्थापित विचार प्रवाहांचा अभ्यास करून ज्यांचे जे जे चांगले त्याचा वास्तव जीवनाशी समन्वय साधून विश्वासकल्याणाचा मूलमंत्र या जगास दिला कष्टासाठी कोणीही मरो, प्रतिष्टेसाठी आपणचि उरो....
हि प्रवृत्ती देशविघातक आणि देशाला मागे नेणारी आहे म्हणून या प्रवृत्तीला अशा संकटाच्या वेळी जागे करण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंतांचे विचार हि काळाची गरज आहे. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे सालाबाद प्रमाणे श्रीराम मंदिरात संगीतमय तुलसी रामायण कथेचे आयोजन करण्यात आले असून सदर कथेचे वाचन हभप श्रीकृष्णकृपा मृती महाराज अयोध्या यांच्या मधुर वाणी.