आंध्र प्रदेशमध्ये खाजगी बसची धडक लागून बसला आग; १४ जणांचा मृत्यू

26 Mar 2026 09:29:18
नवी दिल्ली,
andhra bus accident आंध्र प्रदेशातील मार्कापुरमजवळ, रायवरम येथे एका प्रवासी बसची टिपर लॉरीला धडक लागली, १४ जणांचा जळून मृत्यू ,व अंदाजे १८ जण जखमीआहेत. हा अपघात एका स्लॅबच्या खाणीजवळ झाला, जिथे बसला आग लागली आणि अनेक प्रवासी अडकले.
 
बस accident
 
 
 
भरधाव वेगाने जाणाऱ्या बसची खडीने भरलेल्या टिपरला धडक बसल्याने भीषण आग लागली. बस पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. स्थानिक वृत्तानुसार, किमान १४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अधिकारी अधिक माहिती गोळा करत आहेत.
मार्कपुरमचे उपअधीक्षक (डीएसपी) नागराजू यांनी एका टीव्ही चॅनलला सांगितले की, अंदाजे १४ जण जिवंत जळाले असून, सुमारे १८ जखमींना वाचवून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पीडितांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.
त्यांनी सांगितले की, बचाव पथके पीडितांची ओळख पटवण्याचे आणि त्यांच्या नातेवाईकांविषयी माहिती गोळा करण्याचे काम करत आहेत; पडताळणी पूर्ण झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात येईल.
नागराजू यांनी सांगितले की, काही मृतदेह अजूनही बसमध्ये अडकले असल्याची शक्यता आहे; अपघातानंतर बसला आग लागल्याने मृतदेह बाहेर काढणे अवघड झाले आहे.andhra bus accident दरम्यान, मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले असून, जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0