पाचगावमध्ये बस उलटली, 7 जखमी

26 Mar 2026 21:24:46
अनिल कांबळे
 
नागपूर, 
प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी Bus accident बस उलटली. या अपघातात 7 प्रवाशी जखमी झाले. ही घटना उमरेड मार्गावरील पाचगाव शिवारात गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. जखमींना तातडीने पाचगाव प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी दाेघांची प्रकृती गंभीर असून त्यांना मेडिकलच्या ट्राॅमा सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे.
 
 
acc dksldsk
 
या Bus accident  अपघातात विजय भाऊराव काळे (70, रा. उमरेड), संजय गाेविंदा बावणे (42, रा. मालेवाडा), सूरज वसंत गजभिये, साेनाली श्रीकृष्ण नागरे (30), वैष्णवी मंगेश मेश्राम (19, रा. बाकरला), केशराबाई नागरे आणि भाऊराव शेंडे हे जखमी झाले. यापैकी पाच जणांना किरकाेळ दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली. तर चालक विनाेद इंगाेले आणि क्लिनर शेखर गायकवाड यांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. .
Powered By Sangraha 9.0