- पोलिस तपासात उघड
गोंदिया,
David Anil Mouje missing तालुक्यातील कटंगी येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलगा सायकलने आश्रमशाळेत जाण्यासाठी घरून निघाल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना २५ मार्च रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून मुलाचा शोधही सुरू करण्यात आला होता. दरम्यान, आज, गुरुवारी २६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास सदर मुलगा हा आपल्या नातेवाईकाच्या घरी असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, David Anil Mouje missing डेव्हिड अनिल मौजे (वय १२ वर्षे, रा. कटंगी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) हा गोरेगाव जवळील घोटी येथील आश्रम शाळेत शिक्षण घेत असून होळी सणापासून तो शाळेत जात नव्हता. यावर आश्रमशाळेतील शिक्षकांनी त्याच्या घरी संपर्क साधून मुलाला शाळेत पाठविण्याबाबत सांगितले होते. दरम्यान, २४ मार्च रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास डेव्हिड हा सायकलने शाळेत जातो असे सांगून घरातून निघाला होता. मात्र, तो प्रत्यक्षात शाळेत पोहोचला नाही. सायंकाळपर्यंत तो घरी परत न आल्याने त्याच्या आई-वडिलांनी नातेवाईक व परिसरात त्याचा शोध घेतला, परंतु तो कुठेही आढळून आला नाही. शेवटी, त्यांनी गोरेगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३७ (२) अन्वये गुन्हा नोंद करून शोधमोहीम सुरू केली. या घटनेमुळे कटंगी व परिसरात चिंतेचे वातावरण पसरले. त्यातच सदर मुलगा हा शाळेत जाण्याच्या भितीने गोरेगाव येथे त्याच्या नातेवाईकांकडेच लूपन असल्याचे गुरुवारी २६ मार्च रोजी दुपारनंतर उघडकीस आले. विशेष म्हणजे, सद्या लहान मुलांच्या अपहरणाच्या अफवा पसरलेल्या असताना सदर मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आल्याने पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ४ पथक नमून तपासाला सुरूवात केली होती. त्यात सदर मुलगा हा नातेवाईकाकडे मिळून आल्याने त्याच्या आई-वडीलांसह सर्वांनी सुटकेचा निःश्वास घेतला.
...