इस्रायलचा मोठा दावा...इराणचे नौदल प्रमुख ठार

26 Mar 2026 15:20:55
जेरुसलेम,
Iran's navy chief killed मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने मोठा दावा केला आहे. इस्रायली लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बंदर अब्बासवर झालेल्या हल्ल्यात इराणच्या आयआरजीसी नौदल प्रमुख अलीरेझा तंगसिरी ठार झाले आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले की, होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या कारवायांसाठी तंगसिरी जबाबदार होता. तथापि, इराणने या हल्ल्याबाबत किंवा तंगसिरी यांच्या मृत्यूबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही.
 
 

अलीरेज़ा तंगसिरी 
 
ऑगस्ट २०१८ पासून आयआरजीसी नौदलाचे नेतृत्व करणाऱ्या तंगसिरी यांनी गेल्या काही आठवड्यांत होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या आसपासच्या भागात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी अमेरिकेच्या आखाती तळांवर प्रतिहल्ल्याची धमकी दिली होती आणि नागरिकांना व कर्मचाऱ्यांना त्या भागापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता.
 
 
होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक तेल वाहतूक मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे, जो इराणच्या उत्तरेपासून ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या दक्षिणेपर्यंत पसरलेला आहे. हा मार्ग पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी आणि अरबी समुद्राशी जोडतो. जागतिक अंदाजानुसार, २० टक्के पेक्षा जास्त कच्चे तेल आणि द्रवायन गॅस या मार्गातून वाहतूक होतो. इराणी नौदलाने युद्धाच्या काळात हा मार्ग रोखून धरल्यामुळे अनेक जहाजांना येथून जाण्याची मर्यादित परवानगी आहे.
Powered By Sangraha 9.0