मीरा-भाईंदरमध्ये भीषण आग

26 Mar 2026 18:00:08
मीरा-भाईंदर
Mira Bhayandar fire मीरा-भाईंदर शहरातील प्लेझंट पार्क परिसरात लागलेल्या भीषण आगीने मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला असून, या दुर्घटनेत चार ते पाच इमारती आगीच्या विळख्यात सापडल्या. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार अक्षरशः जळून खाक झाले आहेत. घरगुती साहित्य, मालमत्ता तसेच उपजीविकेची साधने आगीत भस्मसात झाली असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Mira Bhayandar fire, Pleasant Park fire incident, 
या पार्श्वभूमीवर राज्याचे Mira Bhayandar fire  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पीडित कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. या वेळी त्यांनी प्रशासनाला तातडीने मदत व नुकसानभरपाई देण्याच्या सूचना केल्या. “पीडितांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळाली पाहिजे, तसेच त्यांचे पुनर्वसन तातडीने करण्यात यावे,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.दरम्यान, आगीच्या वेळी अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत न पोहोचल्याच्या तक्रारींवर सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली. या संदर्भात संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. “अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होतो. त्यामुळे कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.घटनास्थळी महानगरपालिका अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेऊन सरनाईक यांनी तातडीच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या. आगीसारख्या आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम आणि तत्पर करण्यावर त्यांनी भर दिला.या भीषण आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक तपासात गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलग झालेल्या सिलिंडर स्फोटांमुळे आग झपाट्याने पसरली आणि काही क्षणांतच अनेक घरांपर्यंत पोहोचली. या घटनेत परिसरात उभ्या असलेल्या दोन ते तीन टेम्पोंचेही मोठे नुकसान झाले असून ते पूर्णपणे जळून खाक झाले आहेत.
अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. इमारतीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ परिसरातील वीजपुरवठा खंडित केला होता, त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर नागरिकांकडून सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस आणि प्रभावी पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0