नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा!

26 Mar 2026 12:19:17
लंडन,
Path cleared for Nirav Modi's extradition यूकेमध्ये २०१९ पासून तुरुंगात असलेल्या नीरव मोदीच्या भारतात प्रत्यर्पणाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. हिरे व्यापारी नीरव मोदीने प्रत्यर्पणाविरोधातील पुनर्विचार याचिका लंडनच्या उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, प्रकरण पुन्हा उघडण्यासाठी कोणतीही विशेष परिस्थिती आढळत नाही. यूकेच्या मुकदमा विभागाने तसेच सीबीआयच्या पथकाने याचिकेविरोधात ठोस युक्तिवाद मांडला. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेच्या सुमारे ६४९८ कोटी रुपयांच्या फसवणुकीसाठी भारतात चौकशी सुरू आहे. २०१८ पासून त्याच्या प्रत्यर्पणासाठी प्रक्रिया चालू होती. २०१९ मध्ये यूकेमध्ये अटक झाल्यानंतर ब्रिटिश न्यायालयांनी प्रत्यर्पणास मंजुरी दिली होती. त्यानंतरच्या सर्व अपील फेटाळण्यात आल्या होत्या.
 
 
nirav modi
 
नीरव मोदीने आपल्या याचिकेत भारतात परतल्यास गैरवर्तन होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली होती. मात्र न्यायालयाने हा मुद्दा ग्राह्य धरला नाही. ऑगस्ट २०२५ मध्ये या प्रक्रियेत असलेले तात्पुरते कायदेशीर अडथळेही दूर करण्यात आले. सध्या नीरव मोदी १९ मार्च २०१९ पासून ब्रिटिश तुरुंगात कैद आहे. या निकालामुळे भारतात त्याच्या प्रत्यर्पणाचा मार्ग अधिक मोकळा झाला असून, भारत सरकार आणि सीबीआयच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
 
 
नीरव मोदी प्रकरण भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांपैकी एक मानले जाते. त्याच्यावर पंजाब नॅशनल बँकेत १३,००० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. २०१८ मध्ये हा प्रकरण उघडकीस आला. बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट कर्जपत्रे तयार करून परदेशातील बँकांकडून कर्ज उचलण्यात आले. हे व्यवहार बँकेच्या अधिकृत प्रणालीमध्ये नोंदवले जात नव्हते, त्यामुळे फसवणूक अनेक वर्षे चालू राहिली.
Powered By Sangraha 9.0