पुलगाव,
Picture coloring competition आर. के. ट्रस्ट पुलगाव द्वारा संचालित आर. के. ज्ञान मंदिरम इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य नितीन श्रीवास व कला शिक्षक सुभाष जगताप यांना कला तपस्वी पुरस्कार २०२६ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्य महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मान्यता प्राप्त महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळ व संलग्न वर्धा जिल्हा कलाध्यापक संघ द्वारा आयोजित जिल्हा स्तरीय चित्र रंगभरण स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राचार्य नितीन श्रीवास व कला शिक्षक सुभाष जगताप यांनी प्रयत्न केले. आर. के.तील ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी केले. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांना देखील सन्मान करण्यात आला.
जिल्हास्तरीय Picture coloring competition चित्र रंगभरण स्पर्धेत उत्तम कार्य केल्याबद्दल पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. अभिजीत वंजारी, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचे राज्याध्यक्ष नरेंद्र बारई, वर्धा जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे सचिव सुरेश बरे, कला अध्यापक संघाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष आशिष पोहाणे, वर्धेचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे, वर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल आर. के. ट्रस्टचे अध्यक्ष हरीप्रकाश केजरीवाल व आर. के. शाळा समितीचे अयक्ष रंजनकुमार केजरीवाल, पर्यवेक्षक प्रीती बिडकर, प्रणिता कोंबे, आदींनी दोघांचेही अभिनंदन केले.