राममय नाद घुमला त्रिभूवनी!

26 Mar 2026 21:49:05
94 चित्ररथांनी बहरली शाेभायात्रा ; दक्षिण नागपूर परिसर झाला भगवामय
 
अनिल कांबळे
नागपूर, 
भगव्या पताका, आंब्याच्या पानांची ताेरणे आणि रस्त्यावर फुलांचा सडा टाकून प्रभू श्रीरामचंद्राचा जन्माेत्सव साेहळा गुरुवारी भक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्त पाेद्दारेश्वर राम मंदिरद्वारे काढण्यात आलेल्या शाेभायात्रेमुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला. Poddareshwar Ram Mandir पाेद्दारेश्वर मंदीरापासून ते अग्रेसन चाैकापर्यंत सेवाभावी संस्था, संघटनांद्वारे महाप्रसादाचे आयाेजन करण्यात आले हाेते. शाेभायात्रेतील 94 चित्ररथांना डाेळ्याचे पारणे फेडावे, असे देखावे निर्माण केले. या संपूर्ण भक्तीमय वातावरणात प्रत्येक जण श्रीरामाच्या जल्लाेषात रंगला हाेता.
 
 

p ram-1
 
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापाैर नीता ठाकरे, खासदार माया इवनाते, आमदार प्रवीण दटके, उपमहापाैर लिलाताई हाथीबेंड, भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी खासदार अजय संचेती, पद्मश्री सत्यनारायण नुवाल, उद्याेजक नितीन खारा, जयप्रकाश गुप्ता, सुधाकर काेहळे आदींच्या उपस्थितीत भगवान श्रीराम, माता सीता, भगवान लक्ष्मण आणि संकटमाेचक हनुमान यांच्या प्रतीमा विराजमान असलेल्या रथाची विधीवत पूजा करण्यात आली. हनुमान चालिसा पठण आणि आरतीनंतर शाेभायात्रेला सुरुवात झाली. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी भाविकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. यावर्षी पाेद्दारेश्वरच्या शाेभायात्रेत विविध पाैराणिक प्रसंग दर्शविणाऱ्या 94 चित्ररथांचा समावेश हाेता. त्याशिवाय पाच्ञजन्य श्रीराम सेवक शंख दलाच्या 351 सदस्यांद्वारे करण्यात आलेला शंखनाद, 108 मंगलकलशधारी कन्या, गांधीबाग स्केटिंग क्लब आणि लाेटस राेलर स्केटिंग क्लबचे स्केटर्स, भगवान शंकराची वरात घेऊन जाणारी बच्चा पार्टी, खदान लाेकनृत्य पथकाचा रास गरबा, लेझीम नृत्य, युवा लान्सर्स क्रीडा मंडळाचे लाेकनृत्य, संत चांदुराम साहब दरबार सेवा मंडळाचे सिंधी छेज नृत्य तसेच श्रीरामदेवबाबा सेवक संघाचा 51 ूट लांब आणि 11 फूट उंच ’अश्वमेघ ध्वज’, मिशन विश्व ममत्व फाउंडेशनद्वारे किन्नरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संस्थेद्वारे देवी यल्लमाचा देखावा असलेला चित्ररथ विशेष आकर्षण ठरलेत.
 

p ram 2 
108 मंगलकलशाने वेधले लक्ष
सायंकाळी चार वाजता Poddareshwar Ram Mandir  पाेद्दारेश्वर राममंदिरातून निघालेली ही शाेभायात्रा पुढे हंसापुरी, हुतात्मा चाैक, काेतवाली, सुभाष राेड, काॅटनमार्केट, सीताबर्डी मार्गे राम मंदिरात परतली. शाेभायात्रेच्या मुख्य रथाच्या पुढे गुलाबी साड्यांमध्ये 108 मंगलकलश डाेक्यावर घेऊन चालणाèया कन्या हाेत्या. शिस्तबद्ध संचालन आणि अनुशासन दर्शविणाèया या मंगलकलश वाहक कन्यांनी शाेभायात्रेत नागरिकांचे लक्ष वेधले.
महाप्रसाद आणि शितपेयाने
महाप्रसाद वाटपाची नागपुरी संस्कृती यंदाही उत्स्ूर्तपणे सर्वांनी अनुभवली. शाेभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांसाठी विविध संस्था व संघटनांनी पाेहे, मसाला चना, आईस्क्रीम, ताक, थंड पाणी, लस्सी, लिंबूपाणी, उसाचा रस, बुंदी, पंजिरी प्रसाद, हलवा, फळे, विविध प्रकारची मिठाई आदींचे वितरण करण्यात आले, तर मंदिरार्ते सूंठ-साखरेचा प्रसाद वितरित करण्यात आला.
स्वच्छतादुतांची तत्परता
पाेद्दारेश्वर मंदिर परिसरातून प्रभू श्रीरामांची शाेभायात्रा पुढे सरकताच महापालिकेच्या स्वच्छतादुतांनी तत्परता दाखवली. शाेभायात्रा समाेर गेल्यानंतर काही वेळातच महापालिकेच्या स्वच्छतादूत रस्त्या स्वच्छ करीत हाेते. रस्त्यावरील रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, वेफर्सचे रिकामे पाकिटे, खाली पडलेले खाद्यान्न आणि अन्य कचरा उचलून लगेच घंटागाडीत टाकून नेण्यात येत हाेता.
Powered By Sangraha 9.0