पोलिस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

26 Mar 2026 17:47:59
अमरावती पोलिस विभागात खळबळ
 
अमरावती, 
Police officer commits suicide पोलिस मुख्यालयात गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. माहितीनुसार, क्यूआरटीचा (शीघ्र कृती दल) पोलिस कर्मचारी विजय नागपुरे यांनी स्वतःवर गोळी झाडून पोलिस आयुक्त कार्यालयासमोरील मुख्यालयातील क्यूआरटी कक्षात गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धावले.
 
 
police
 
Police officer commits suicide  मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. विजय नागपुरे यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
Powered By Sangraha 9.0