घोडा यात्रा ठरले आकर्षण
समुद्रपूर,
Ramjanmotsav : Girad गिरड येथील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराच्या इतिहासाला दोन दशकपूर्ती होऊन तिसर्या दशकात प्रवेश केला आहे. या श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव २१० वर्षापासून निरंतर सुरू आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन हभप रुपेश महाराज तळवेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी मंदिरात वर्षानुवर्ष सुरू असलेल्या परंपरेने महिलांनी रामाची पूजा करुन रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. राम भक्तांनी गुलाल उधळुन आनंद उत्सव साजरा केला.
Ramjanmotsav : Girad प्रभू श्रीराम की जय घोषाने संपुर्ण गिरड गाव दुमदुमले होते. यावेळी मंदिर विश्वस्तांच्या वतीने मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला श्रीराम देवस्थान कमेटीचे अध्यक्ष बलवंत गाठे, उपाध्यक्ष वसंत पर्बत, सचिव संदीप शिवणकर, विश्वत शालिक लांडे, सुधिकर बाकडे, नंदिनी टिपले, पुनम ब्राह्मणवाडे, माजी सरपंच विलास नवघरे, पोलिस पाटील मनोज तेलरांधे, जिपचे माजी सदस्य फकिरा खडसे, अरुण मोटघरे माजी उपसरपंच नुतन गिरडे, निलेश पिंजरकर, सामाजिक कार्यकर्ते श्याम नवलाखे, गवती महाराज, संत प्रकाश वानासाने, कवडजी वानोडे, सुरेश गाढवे, निर्भय पांडे, प्रमोद पानबुडे, आदी उपस्थित होते. यावेळी गिरड परीसरातील पोलीस दलात निवड झालेले गुरूदेव सेलोरे, चेतन आखुड, अनिकेत मुळे, सारंग धोटे, सौरभ धाबर्डे, निलेश जनबंधु यांचा आईवडिलांसह गौरव करण्यात आला.तसेच उत्सवासाठी अहोरात्र सहकार्य करणार्या तरुणांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. सांयकाळी ६ वाजता मंदिर परिसरातून सुप्रसिद्ध १४० वी घोडायात्रेला सुरूवात करण्यात आली.