९.५९ कोटींच्या खर्चातून होणार बाकडी नदीचे पुनर्जीवन

26 Mar 2026 17:38:48
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून प्रस्ताव मंजूर
आ. वानखेडे यांच्या पाठपुराव्याला यश
वर्धा, 
आर्वी तालुयातील Revitalization of the Bakdi River बाकडी नदीच्या पुनर्जीवनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला आहे. आ. सुमित वानखेडे यांच्या संकल्पनेतून आणि सततच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या या कामामुळे बाकडी नदीचे जवळपास १३ किमीचे काम होणार आहे. ९ गावातील शेतकर्‍यांना याचा लाभ होईल. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने काम होणार असून यामुळे तालुयातील जलसंधारण व शेती विकासाला मोठा हातभार लागणार आहे.
 
 
adkdsl
 
नदी व धरणांची पाणी धारण, वहन व सिंचन क्षमता वाढविण्यासाठी त्यातील गाळ काढणे व हा सुपिक गाळ शेतात पसरविण्यासाठी शेतकर्‍यांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी जलसंधारण विभागाच्यावतीने गाळमुत धरण व गाळयुत शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण या दोन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आर्वी तालुयातील बाकडी नदीच्या पुनर्जीवनासाठी गाळ काढणे तसेच नाला खोलीवकरण व रुंदीकरणाच्या कामास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.
 
 
तालुयातील महादपूर, हरिशवाडा, बेलोरा, जळगाव, देव्हाडा, शिरपूर, एकलारा, माटोडा व नांदपूर या गावांच्या दरम्यान बाकडी नदीतील जवळपास ८ लाख २३ हजार २०३ युबीक मीटर इतका गाळ काढण्यात येणार आहे. तसेच चिस्तुर ते नांदपूर या गावांच्या दरम्यान नदीवर जवळपास १३ किमी क्षेत्रात खोलीकरण व रुंदीकरणाचे काम होणार आहे. या सर्व कामांवर साधारणपणे ९ कोटी ५९ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. त्यात राज्य शासनाचा वाटा ४ कोटी ९० लाख तर टाटा ट्रस्ट या संस्थेचा सामाजिक दायित्व अंतर्गत वाटा ४ कोटी ६९ लाख रुपये इतका आहे. कामाच्या या खर्चास देखील मंजुरी देण्यात आली आहे. नदी परिसरातील ९ गावातील शेतर्‍यांच्या १ हजार ९६१ क्षेटर क्षेत्रावर याचा लाभ होणार आहे.
 
 
Revitalization of the Bakdi River या कामामुळे नदीची पाणी वहन क्षमता वाढणार असून पावसाळ्याच्या दिवसात निर्माण होणार्‍या पुरस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित होणार आहे. परिसरातील शेतकर्‍यांना लाखो मेट्रीक टन गाळ विनामूल्य उपलब्ध होणार असल्याने त्यांच्या उत्पादकतेत वाढ होण्यास मदत होईल. राज्य शासन व टाटा ट्रस्टच्या संयुत खर्चातून प्रकल्प मार्गी लागणार आहे. तर पुणे येथील बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे.
 
 
नदी परिसरातील शेतकर्‍यांना फायदा : आ. वानखेडे
Revitalization of the Bakdi River बाकडी नदी आर्वी तालुयातील महत्त्वाची नदी आहे. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने नदीची वहन आणि पाणी धारण क्षमता कमी झाली. त्यामुळे पावसाळ्यात पुराचा देखील धोका निर्माण होतो. नदी परिसरातील शेतकर्‍यांना नदीच्या पाण्याचा तसेच सुपिक गाळाचा उपयोग व्हावा यासाठी नदीच्या पुनर्जीवनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावास मान्यता दिल्याने नदी काठावरील ९ गावांच्या हजारो शेतकर्‍यांना प्रत्यक्ष लाभ होणार असल्याची प्रतिक्रीया आ. सुमित वानखेडे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0