हर्षवर्धन सदगीरला शरद पवार यांची १२ लाखांची मदत

26 Mar 2026 17:44:54
मुंबई
Harshvardhan Sadgir महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला सातत्याने पाठबळ देणारे ज्येष्ठ नेते तथा कुस्तीगीर परिषदेचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील तयारीसाठी महत्त्वाची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पुढील दोन वर्षांसाठी सराव आणि खुराकासाठी दरमहा ५० हजार रुपये याप्रमाणे एकूण १२ लाख रुपयांची मदत देत पवार यांनी सदगीरच्या कामगिरीचे कौतुक केले.
 

Sharad Pawar, Harshvardhan Sadgir, Maharashtra Kesari, 
डबल महाराष्ट्र केसरी किताब Harshvardhan Sadgir  पटकावल्यानंतर हर्षवर्धन सदगीर यांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे संस्थापक अर्जुनवीर काकासाहेब पवार, उद्योजक मोहसीन बागवान, शासकीय कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी आणि पृथ्वीराज पाटील यांच्यासह मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी सदगीरच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा गौरव करत त्याला भविष्यातील स्पर्धांसाठी प्रोत्साहन देण्यात आले.गेल्या दशकभरापासून हर्षवर्धन सदगीर राज्यातील पहिल्या फळीत कुस्ती करत असून २०१८ मध्ये महाराष्ट्र केसरी किताब जिंकल्यानंतर त्याने डबल महाराष्ट्र केसरी किताबासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यश-अपयशाची पर्वा न करता अखंड मेहनत आणि चिकाटी यामुळे त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. याच जिद्दीची दखल घेत शरद पवार यांनी त्याचे विशेष कौतुक केले.
 
 
केवळ सदगीरलाच मदत न Harshvardhan Sadgir  करता कुस्ती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठीही पवार यांनी पुढाकार घेतला आहे. अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या विकासासाठी आणि अद्ययावत सोयीसुविधा उभारण्यासाठी ५० लाख रुपयांची विशेष आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील कुस्तीपटूंना दर्जेदार प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी वाढणार आहे.महाराष्ट्रातील पारंपरिक कुस्ती कलेला प्रोत्साहन मिळावे आणि मल्लांनी जागतिक स्तरावर यश संपादन करावे, यासाठी शरद पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. होतकरू कुस्तीपटूंना दत्तक घेऊन त्यांना सराव आणि खुराकासाठी मदत करण्याची त्यांची परंपरा कायम राहिली आहे. त्यामुळे कुस्ती क्षेत्रात ते एक भक्कम आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात.यावेळी प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सदगीर म्हणाला की, ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे माझे ध्येय आहे. काही काळ निराशेमुळे मी कुस्तीतून निवृत्त होण्याचा विचार केला होता, मात्र गुरू काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनामुळे पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांनी दिलेली आर्थिक मदत माझ्यासाठी मोठे प्रोत्साहन असून यामुळे मला नव्या उर्जेने तयारी करता येईल.शरद पवार यांच्या या उपक्रमामुळे राज्यातील कुस्ती क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0