‘त्या’ पोलिस अधिकार्‍यावर कारवाईची मागणी

26 Mar 2026 20:51:01
श्रमिक पत्रकार संघटनेचा पुढाकार

यवतमाळ, 
Shramik patrakar sanghaṭan येथील दैनिक लोकसूत्रचे कार्यकारी संपादक केशव सवळकर यांच्यासोबत अत्यंत अर्वाच्य भाषेत गैरवर्तन करणार्‍या सहपोलिस निरीक्षक पंकज दाभाडे यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांना निवेदन देण्यात आले.
 
 
shramik
 
श्रमिक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत राऊत यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव अमोल ढोणे, संजय सावरकर, प्रवीण देशमुख, अशोक गोडंबे, गणेश राऊत व इतर पदाधिकारी मोठ्या सं‘येने उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दारव्हा-कारंजा मार्गावरील भांडेगाव टोलनाका बंद करण्यासाठी महाविकास आघाडीने आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या संकलनासाठी जिल्ह्यातील विविध माध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी सुरक्षेसाठी बॅरिकेट्स लावले होते. मात्र, पत्रकारांनी आपली ओळख पटवून दिल्यानंतर त्यांना टोलनाक्यापर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. आंदोलनस्थळी परिस्थिती शांत असतानाही कर्तव्यावर तैनात असलेल्या सहपोलिस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी अचानक आक‘मक पवित्रा घेतला.
 
 
Shramik patrakar sanghaṭan त्यांनी तेथील नागरिक आणि पत्रकारांना शिवीगाळ हाकलून देण्यास सुरुवात केली. यावेळी संपादक केशव सवळकर यांनी आपली ओळख देत ओळखपत्र दाखवून आपण पत्रकार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दाभाडे यांनी त्यांचा हात जोरात पकडून त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे दाभाडे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
Powered By Sangraha 9.0