रामराज्य म्हणजे नैतिक पुनरुत्थानाची चळवळ – माधुराज

26 Mar 2026 16:58:48
नागपूर,
Shri Ram Janmatsav श्रीराम जन्मोत्सवानिमित्त वसंत नगर येथील श्री संकट मोचन हनुमान मंदिरात आयोजित व्याख्यानात प्रख्यात वक्ते माधुराज यांनी रामकथेतून आधुनिक जीवनाला दिशा देणारे विचार मांडले.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, रामराज्य ही केवळ राजकीय संकल्पना नसून समाजाच्या नैतिक पुनरुत्थानाची व्यापक चळवळ आहे.
 

mb 
 
रामायण हे केवळ एक महाकाव्य नसून मानवी मनाचे सूक्ष्म विश्लेषण करणारे शास्त्र आहे. श्रीरामांचे चरित्र हे आदर्श जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरते, असेही त्यांनी स्पष्ट केले. Shri Ram Janmatsavसीता, उर्मिला आणि सुमित्रा यांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी दाखविलेला त्याग, संयम आणि कर्तव्यनिष्ठा यांमुळेच रामराज्याची भक्कम उभारणी शक्य झाली, याकडेही त्यांनी विशेष लक्ष वेधले.या व्याख्यानाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सौजन्य:माधवी भूत,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0