जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांचे आवाहन
वर्धा,
Sufficient fuel: District Collector Vanmathi C. युद्धाच्या तणावपूर्ण पृष्ठभूमीवर वर्धेसह जिल्ह्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. त्यामुळे वाहनधारक इंधन भरण्यासाठी पंपांवर गर्दी करत आहे. जिल्ह्यात पुरेसे इंधन असल्याने नागरिकांनी पेट्रोलपंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले आहे.
Sufficient fuel: District Collector Vanmathi C. जिल्ह्यात सर्वच पेट्रोल पंपावर अतिरित स्वरुपामध्ये वाहनामध्ये इंधन भरण्यासाठी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे वाहनधारकांनी इंधन भरण्यासाठी पेट्रोलपंपावर गर्दी करू नये व कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वच पेट्रोलपंप कंपनीच्या विक्री अधिकारी, प्रतिनिधी यांना प्रशासनामार्फत इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. अफवा तसेच चुकीची माहिती पसरविणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.