मविआच्या आंदोलनामुळे ‘टोलनाका’ मुद्यावर बैठक

26 Mar 2026 21:06:38
यवतमाळ, 
'Tolnaka' issue लोकांच्या प्रश्नावर केवळ निवेदनेच नव्हे तर आक‘मक आंदोलने करावी लागतात ही जाणीव झाल्याने दारव्हा-कारंजा रस्त्यावरील टोलनाका बंदीसाठी दोनवेळा राहुल ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने आंदोलन केले. मात्र, आता या आंदोलनामुळे पालकमंत्री संजय राठोड यांना बैठक घ्यावी लागत आहे. शुक‘वार, २७ मार्चला दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या ही बैठक होणार असून या बैठकीला जिल्हा प्रशासनाने राहुल ठाकरे यांनाही निमंत्रित केले आहे. दारव्हा-कारंजा राष्ट्रीय महामार्ग क‘. ३६१ सी भुलाईजवळील टोल प्लाझा अत्यंत नियमबाह्य पद्धतीने अकोला सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उभारला आहे. येथे टोलच्या अंतरासंदर्भातील नियम पाळले गेलेले नाहीत. ग‘ामीण शेतकर्‍यांच्या वाहनांकडून दररोज अवास्तव टोल जातो आहे.
 

tolnaka 
 (संग्रहित छायाचित्र )
 
'Tolnaka' issue त्यामुळे सर्वप्रथम या भागातील जनतेची पिळवणूक होत असल्याने जिल्हा काँग‘ेस उपाध्यक्ष व यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, काँग‘ेस तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे यांनी २ मार्चला हा टोल बंद व्हावा म्हणून दारव्हा उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन दिले. मात्र, या निवेदनाची दखल प्रशासनाने न घेतल्याने ११ व २३ मार्चला आंदोलन करण्यात आले. उबाठा शिवसेना, शप राकाँ, प्रहार व इतरही पक्षांनी या आंदोलनात लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणून उडी घेतली. ११ मार्चला टोलनाक्याची तोडफोड झाल्यानंतर जिल्हाधिकारी विकास मिना यांनी बैठक घेतली होती. त्या बैठकीला आंदोलनकर्त्यांना बोलावले होते. एकंदरीत जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानंतरही हा टोल बंद झाला नाही. त्यामुळे पुन्हा २३ मार्चला टोलनाक्यावर झाले. याठिकाणी नागरिकांची मोठी सं‘या होती. या आंदोलनाला जनतेचे पाठबळ मिळत असल्याने प्रशासन हादरले आहे.
Powered By Sangraha 9.0