मी जन्मापासून शिवसेनेत’ संजय राऊतांचा टोला

26 Mar 2026 18:46:21
मुंबई
Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक झाली. ऑपरेशन टायगर राबवले जाणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक राजकीय दृष्ट्या लक्षवेधी ठरली. राज्यसभेची हक्काची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्याने प्रियंका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केली, असे सूत्रांनी सांगितले.
 

Uddhav Thackeray 
या प्रकरणावर आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले. राऊत म्हणाले, “विचार करून काम करायला लागलो नसतो तर पक्ष इतका मोठा झाला नसता. पण अशा प्रकारची काही घटना घडली नाही. अफवा पसरवल्या जातात, त्यावर विश्वास ठेवू नये. मी या पक्षाच्या स्थापनेपासून आणि माझ्या जन्मापासून पक्षात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राऊतांनी प्रियंका चतुर्वेदीच्या नाराजीवर पडदा टाकल्याचे स्पष्ट केले.शिवाय, अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री आणि पोलीस यांना शांतपणे काम करण्याची संधी द्यावी. रोज या विषयावर चर्चा करून राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करू नये. तपास सुरू आहे, त्यावर संशय व्यक्त करणे योग्य नाही.”
अजितदादा पवार यांना Uddhav Thackeray  राष्ट्रवादी ताब्यात घेण्यासाठी निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार झाल्याबाबत राऊतांनी प्रतिक्रिया देणे टाळले आणि सांगितले, “शिवसेना म्हणून आम्ही कशाला प्रतिक्रिया द्यायची?”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती युद्धाविषयी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “जर त्या बैठकीला पंतप्रधान उपस्थित नसतील, तर त्या बैठकीला काही अर्थ नाही. पंतप्रधान येणार नव्हते, तर आम्ही त्या बैठकीला जाणे टाळायला हवे होते.”कालच्या बैठकीचे पडसाद आणि पक्षातील राजकीय परिस्थिती यावरून भविष्यात कोणते निर्णय होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0