वणी,
जैताई देवस्थानात आयोजित श्रीराम चरित्र दर्शन प्रवचनमालेत प्रख्यात प्रवचनकार Vivek Ghalsasi विवेक घळसासी यांनी मंगळवार, २४ मार्च रोजी तिसरे पुष्प गुंफत उपस्थितांना श्रीरामांच्या आदर्श जीवनमूल्यांचा दिला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, राजा दशरथाच्या पोटी जन्मलेली राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ही चारही मुले प्रत्यक्ष वेदस्वरूप होती. सूर्यवंशातील पराक्रमी परंपरेत भगवान श्रीरामांचे स्थान अनुपमेय आहे. श्रीराम समजून घेण्यासाठी अंतःकरणाची शुद्धता अत्यावश्यक आहे.
मानव आपल्या आचरणात अनिष्ट गोष्टी अधिक स्वीकारतो, तर इष्ट गोष्टी केवळ औपचारिकतेपुरत्या मर्यादित याकडे लक्ष वेधत त्यांनी कर्मकांडातील प्राण, वाणीतील आर्तता आणि चित्तातील शुद्धतेचे महत्त्व स्पष्ट केले. आरतीत आर्तता आणि मनात शुद्धता असेल, तरच भक्तीचा खरा अर्थ साध्य होतो, असे ते म्हणाले. श्रीरामांचे व्यक्तिमत्त्व शांततेचे प्रतीक असून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपली आंतरिक शांतता ढळू दिली नाही. अनुचित बोलणार्यांना त्यांनी कधीही प्रतिवाद केला त्यांच्या वर्तनातून नम‘ता, अभिवादनशीलता आणि दीनांप्रती करुणा दिसून येते, असे Vivek Ghalsasi घळसासी यांनी सांगितले.
राष्ट्रीय एकात्मतेसाठी श्रीरामांनी वनवासी व आदिवासी समाजाला मु‘य प्रवाहात आणले. स्वतःच्या गुणांविषयी मौन आणि दुसर्यांच्या गुणांचे कौतुक हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. धर्माविषयी अज्ञान, दिखाऊपणा आणि आसक्तीमुळे अधर्माचे प्राबल्य वाढत असल्याचे सांगत त्यांनी श्रीरामांचे आत्मसात करण्यासाठी स‘यभाव, साधना आणि सत्संग आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. लक्ष्मणांच्या जागरूकतेचा उल्लेख करत विवेक घळसासी यांनी सांगितले की, सदैव जागृत राहणारा भक्तच श्रीरामाशी जोडला जातो. शबरी व निषाद यांसार‘या भक्तांना स्थान देत श्रीरामांनी जात-पात न मानता अंतःकरणाची शुद्धता महत्त्वाची मानली. श्रीरामाचे सोंग आणणे सोपे आहे, पण श्रीराम होणे आहे. कार्यक‘माचे संचालन सागर मुने यांनी केले.