श्रीकांत टेकाडे यांचे प्रतिपादन
आयईईएचएम तर्फे जागतिक वन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर,
मानवी अस्तित्व टिकवण्यासाठी वनसंवर्धन अत्यावश्यक असून विकासाचे नियोजन करताना जंगलांचे संरक्षण अनिवार्य आहे, असे प्रतिपादन राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य व वनतज्ञ श्रीकांत टेकाडे यांनी केले. World Forest Day जागतिक वन दिननिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
लक्ष्मीनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंट इकॉलॉजी हेल्थ अॅन्ड मॅनेजमेंट (आयईईएचएम) कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष विश्वनाथ कोल्हटकर होते. प्रारंभी त्यांनी संस्थेच्या वनसंवर्धन व जनजागृती उपक्रमांची माहिती देत विविध पर्यावरणीय कामांचा आढावा सादर केला.
पुढे बोलताना टेकाडे यांनी सांगितले की, नागपूरसारख्या शहरांमध्ये वाढत्या शहरीकरणामुळे हरितक्षेत्र कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रभावी वृक्षारोपणासोबत त्याचे दीर्घकालीन संरक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. विदर्भात सुमारे २४ टक्के वनक्षेत्र असून त्यात वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
. World Forest Day वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने त्यांनी मध्य भारतातील जंगलांचे आणि कॉरिडॉरचे महत्त्व अधोरेखित केले. वाघांच्या हालचालींसाठी हे मार्ग अत्यंत आवश्यक असून देशात सुमारे ३ हजार १६७ वाघ आढळतात. मात्र जंगलतोड आणि विकासकामांमुळे त्यांच्या अधिवासावर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
तसेच महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्र सुमारे ५७ हजार चौ. कि.मी. (१८.१९ टक्के) असून देशाचे एकूण वन व वृक्षाच्छादन २५.१७ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
. World Forest Day उद्योगांनी कार्बन क्रेडिटसारख्या उपक्रमांत सहभागी होऊन हरित अनुपालन वाढवावे, तसेच नागरिकांनी वृक्षारोपण, वणवे प्रतिबंध आणि जैवविविधतेचे संरक्षण यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, संजय आगरकर यांच्यासह अनेक सदस्य आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.