अखिल भारतीय पाेलिस कर्तव्य मेळाव्याचे नागपुरात आयाेजन

27 Mar 2026 21:41:52
अनिल कांबळे,
नागपूर,
all-india-police-duty-meeting : ‘काैशल्य, शिस्त आणि तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या 69 व्या अखिल भारतीय पाेलिस कर्तव्य मेळाव्याचे आयाेजन करण्याचा मान नागपूर पाेलिस आयुक्तालयाला भेटला आहे. येत्या 29 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत हाेणाèया स्पर्धेचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हाेणार आहे. यामध्ये तब्बल 29 राज्यातील 1327 पाेलिस अधिकारी आणि अंमलदार सहभागी हाेणार आहेत, अशी माहिती राज्याचे गुन्हे अन्वेशन विभागाचे प्रमुख सुनील रामानंद यांनी दिली.
 
 
nagpur
 
 
 
नागपूर पाेलिस आयुक्तालय आणि गुन्हे अन्वेशन विभाग (सीआयडी) यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरात अखिल भारतीय पाेलिस कर्तव्य मेळावा आयाेजित करण्यात आला आहे. हा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा राज्यात दरवर्षी आयाेजित केली जाते. यापूर्वी 68 वा अखिल भारतीय पाेलिस कर्तव्य मेळावा हा रांची, झारखंड राज्यात संपन्न झाला हाेता. सन 2025-26 स्पर्धा ही महाराष्ट्रात घेण्याचे ठरले असून, त्याकरीता नागपूर शहराची निवड झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पाेलिस मुख्यालय स्थित शिवाजी स्टेडीयमवर 29 मार्चला सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते हाेणार आहे. यावेळी भारतातील अनेक वरिष्ठ पाेलिस अधिकाèयांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी पाेलिस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह अन्य वरिष्ठ पाेलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पत्रपरिषदेला पाेलिस आयुक्त डाॅ. रविंद्रकुमार सिंगल आणि सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपस्थित हाेते.
 
 
या स्पर्धेचे महत्व
 
 
अखिल भारतीय पाेलिस कर्तव्य मेळावा हा पाेलिीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचे व्यवसायिक काैशल्य वाढविणे, स्पर्धकांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे, नव-नवीन तपास पध्दती अवगत करून नविन तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करणे, पाेलिस दलात एकमेकांमध्ये समन्वय वाढविणे व कार्यपध्दती सुधारणे एकंदरीत पाेलिस दलाची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि आधुनिकतेकडे वाटचाल करण्यासाठी ही स्पर्धा आयाेजित केली जाते.
 
 
6 विभागात हाेणार स्पर्धा
 
 
पाेलिस कर्तव्य मेळावा हा एकुण 06 विषयातील इन्व्हेंटमध्ये पार पडणार आहे. ज्यामध्ये काॅम्प्युटर अवेरनेस, पाेलिस डाॅग काॅम्पीटीशन, पाेलिस व्हिडीओग्राी, अ‍ॅन्टी सबाेटेज चेक, साईन्टीीक एड टू इन्व्हीस्टीगेशन व पाेलिस ाेटाेग्राी अशा विषयातील इन्व्हेंटमध्ये लेखी तसेच प्रात्यक्षिक स्वरूपात आयाेजीत करण्यात आली आहे. काॅम्प्युटर अवेरनेस ही स्पर्धा रामदेव बाबा अभियांत्रिकी विद्यापिठ, गिट्टीखदान, पाेलिस डाॅग काॅम्पीटीशन राज्य राखीव पाेलीस बल, गट क. 4, हिंगणा राेड तर पाेलिस व्हिडीओग्राी, अ‍ॅन्टी सबाेटेज चेक, साईन्टीीक एड टू इन्व्हीस्टीगेशन व पाेलिस ाेटाेग्राी या चार विषयातील स्पर्धा ही पाेलिस प्रशिक्षण केंद्र, बजाजनगर येथे पार पडणार आहेत.
 
 
3 एप्रिलला हाेणार समाराेप
 
 
मेळाव्याचा समाराेपीय कार्यक्रम 3 एप्रिलला सायंकाळी पाच वाजता शिवाजी स्टेडीयमवर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद गंगाविष्णू राॅय यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. स्पर्धेत विविध विषयातील इव्हेंटमध्ये सर्वाेत्कृष्ठ ठरणारा संघ, स्पर्धक यांना जनरल चॅम्पीयनशिप ट्राॅी, गाेल्ड, सिल्व्हर, ब्राॅन्झ मेडल ईत्यादी स्वरूपातील बक्षीसे वितरित करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0