कॅच द रेन स्पर्धेत भारत विद्यालय जिल्ह्यात प्रथम

27 Mar 2026 21:03:47
हिंगणघाट, 
bharat-vidyalaya : जलशक्ती अभियानांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वर्धा आणि नायरा एनर्जी लिमिटेड यांच्या संयुत वतीने आयोजित जलशक्ती अभियान २०२४-२५ जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण सोहळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा येथे पार पडला. यात स्थानिक भारत विद्यालयाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
 

k 
 
 
 
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे व अधिव्याख्याता सिमा पुसदकर, नवले आदींच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व ७ हजार रुपयांचा धनादेश देऊन शाळेचा गौरव करण्यात आला. तसेच जलशक्ती अभियानांतर्गत घोषवाये स्पर्धेत पूर्वाई सुपारे हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. तिचाही प्रमाणपत्र सन्मानचिन्ह, २ हजाराचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला. शाळास्तर स्पर्धेचे सादरीकरण निकिता कामडी, लावण्या कुरटकार व पूर्वाई सुपारे यांनी केले.
 
 
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रशांत वानखेडे यांना पाचवा क्रमांक प्राप्त झाला. त्यांचा देखील प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांचे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोकुलदास राठी, उपाध्यक्ष श्याम भीमनवार, सचिव रमेश धारकर, मुख्याध्यापक हरीष भट्टड, उपमुख्याध्यापक किशोर चवरे, पर्यवेक्षिका निलाक्षी बुरिले, मनीषा कोंडावार, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.
Powered By Sangraha 9.0