डोंगरगाव केंद्रावर सीईटी पेपर उशिरा; केंद्रावर गोंधळ

27 Mar 2026 16:19:55
नागपूर,
CET paper delayed at Dongargaon center बीएड सीईटी परीक्षेच्या दुसऱ्या सत्रात डोंगरगाव येथील वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी ३:०० वाजता सुरू होणारा पेपर रद्द  झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या.
 
 
Dongargaon
 
तसेच संगणकांवर इंटरनेट नेटवर्क नसल्याने परीक्षा रद्द झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, परीक्षा व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. CET paper delayed at Dongargaon center संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
सौजन्य: अमित तीतारे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0