चिटणीस नगर पाइपलाइन गळतीत लोक त्रस्त

27 Mar 2026 12:14:05
नागपूर,
Chitnis Nagar नागपूरच्या धनतरी नगर आणि चितणीस नगर परिसरात मागील काही दिवसांपासून पाण्याच्या पाइपलाइनमध्ये गळती होत असल्यामुळे सतत मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त केला आहे.
 
Chitnis Nagar
 
नेहरू नगर झोनमधील काही कर्मचारी रस्त्यावर रेती किंवा बांधकाम साहित्य आढळल्यास घरमालकांवर दंडात्मक कारवाई करतात, मात्र पाण्याच्या गळतीसारख्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासन "कुंभकर्णाच्या झोपेत" असल्याचे नागरिकांचे मत आहे. Chitnis Nagar उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाण्याची टंचाई जाणवत असताना सतत पाणी वाया जाणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी नागपूर महानगरपालिका प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सौजन्य: भूषण चावरकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0