‘पीएम टूर’ शेकला; शाखा अभियंत्यांकडून काढला कार्यभार

27 Mar 2026 21:24:04
वर्धा, 
irregularities-in-pm-tour-work : ‘पीएम टूर’ च्या कामात गैरप्रकार केल्या प्रकरणी तक्रार झाल्यानंतर वादग्रस्त ठरलेल्या सेलू येथील शाखा अभियंता एस. एस. खंडार यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम उपविभाग १ येथील कामाचा अतिरित कार्यभार काढण्यात आला आहे. तसा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले यांनी निर्गमित केला आहे.
 
 
k
 
 
 
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीड वर्षांपूर्वी वर्धेत आले होते. त्यांच्या या दौर्‍यासाठी शहरातील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदान परिसरात कामं करण्यात आली. त्या कामांत मोठा गैरप्रकार करून शासकीय निधीचा अपहार करण्यात आल्याची तक्रार बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची दखल घेत अधिकार्‍यांनी स्वावलंबी विद्यालयावरील कामांचा तपासणी केली. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले यांनी सेलू येथील शाखा अभियंता एस. एस. खंडार यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम उपविभाग १ येथील कामाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे.
Powered By Sangraha 9.0