नेपाळ-लडाखमध्ये भूकंपाचे धक्के

27 Mar 2026 10:05:18
नवी दिल्ली,
Earthquake in Nepal-Ladakh लडाखच्या लेहपरिसरात शुक्रवारी सकाळी भूकंपाचे हलके धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार हा भूकंप सकाळी सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास झाला. त्याची ३.९ इतकी नोंदवली गेली आहे. धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने कोणतीही मोठी हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. याचदरम्यान शेजारील नेपाळमध्येही भूकंपाच्या मालिका सुरूच आहे. गुरुवारी सकाळी सुदूरपश्चिम भागात ४.० तीव्रतेचा भूकंप झाला होता. राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राच्या माहितीनुसारच्या माहितीनुसार त्याचे केंद्र दार्चुला जिल्ह्यातील मुरई परिसरात होते. या धक्क्यांचा परिणाम बैतडी आणि बाझंग जिल्ह्यांपर्यंत जाणवला.
 

Nepal-Ladakh
 
त्यापूर्वी सोमवारी दुपारी याच सुदूरपश्चिम भागात आणखी एक भूकंप झाला होता, ज्याची तीव्रता ४.१ इतकी होती. या वेळी बझंग परिसरात धक्के अधिक जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेक जण घराबाहेर पडून मोकळ्या जागेकडे धाव घेताना दिसले. गेल्या काही दिवसांत या भागात सातत्याने भूकंपीय हालचाली होत असल्याने हा परिसर संवेदनशील बनला आहे. १७ मार्च रोजीही दार्चुला भागात ४.० तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला होता.
Powered By Sangraha 9.0