गिरड येथ १४० वर्षांची श्रीराम घोडा रथयात्रा साठवली डोळ्यात!

27 Mar 2026 21:13:36
समुद्रपूर, 
gird-shri-ram-horse-chariot-yatra : गिरड येथील श्रीराम देवस्थानाच्या वतीने १४० वर्षापासून श्रीराम जन्मोत्सवसनिमित्ताने घोडा रथयात्रा काढण्याची परंपरा निरंतर कायम आहे. राम मंदिरातून घोडायात्रा सायंकाळी ७ वाजता काढण्यात आली. यावेळी लाकडी रथावर घोडा व घोड्यावर विराजमान झालेले प्रभू श्रीरामचंद्राचे भाविकांनी दर्शन घेतले. प्रभू श्रीरामाच्या लाकडी मूर्ती समोर दोन मातीचे शिपाई विराजमान करून पूजन करण्यात आले. दोराच्या सहाय्याने राम भक्तांकडून रथ ओढत निघालेल्या या घोडा रथयात्रेत परीसरातील शेकडो भजन मंडळी सहभागी झाले होते.
 
 
k
 
श्रीरामाच्या जयघोषात ही यात्रा गिरड गावातील मुख्यमार्गाने निघाली. या घोडा यात्रेत आ. समिर कुणावार सहभागी होते. मंदिर समितीचे अध्यक्ष बलवंत गाठे यांनी आ. समिर कुणावार व नगरसेवक किशोर दिघे यांचा सत्कार केला. यावेळी आ. कुणावार यांनी येथील रामजन्मोत्सव व घोडा रथयात्रेचे कौतुक करीत याठिकाणी असलेल्या प्राचीन श्रीराम देवस्थानाला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला. आता देवस्थानाच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडून देणार नाही, असे मत व्यक्त केले. या घोडा रथयात्रेसोबत गावातील व बाहेर गावावरून आलेले हजारो रामभक्त सहभागी झाले. समारोप श्रीराम मंदिर देवस्थानात करण्यात आला. यशस्वीतेसाठी श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष बलवंत गाठे, उपाध्यक्ष वसंत पर्बत, सचिव संदीप शिवणकर, विश्वस्त शालिक लांडे, सुधाकर बाकडे, पुनम ब्राह्मणवाडे, नंदिनी टिपले, उत्सव समिती अध्यक्ष सोनू भांदककर यांच्यासह रामभतांनी सहकार्य केले.
 
Powered By Sangraha 9.0