सोमलवार शाळेचे सुवर्ण यश

27 Mar 2026 12:55:13
नागपूर,
Somalwar School सोमलवार निकालस शाळेच्या विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन, नवी दिल्ली द्वारा आयोजित नॅशनल सायन्स ऑलिंपियाड (NSO) २०२५-२६ मध्ये सुवर्णपदके जिंकून शाळेला गौरव मिळवून दिला. इयत्ता दुसरीतील समर्थ निखाडे, श्रीयुत झंझाळ, वेदांत दुबे, स्विकृत भुरे, इयत्ता तिसरीतील प्रियांक कोळणकर, वृषांत क्षीरसागर, जिवंतिका राऊत, आणि इयत्ता चौथीतून मैत्रेयी धनोरकर, धीरा खांते आणि रुद्र मानके यांना “गोल्ड मेडल ऑफ एक्सलन्स” देऊन गौरविण्यात आले.
 
Somalwar School
 
सोमलवार अकॅडमीचे सचिव प्रकाश सोमलवार, शासकीय मंडळाचे सन्माननीय सदस्य, मुख्याध्यापिका अदिती डोळे, पर्यवेक्षिका अश्विनी ठोसर आणि शिक्षकवृंद Somalwar School यांनी विद्यार्थ्यांचे हे उत्तम यशाबद्दल अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन माधवी पांढरीपांडे, निलीमा हरगुडे आणि पूर्वा माटे यांनी केले.
सौजन्य: माधवी पांढरीपांडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0