नागपूर,
Indraprastha Nagar इंद्रप्रस्थ नगर येथील शिव मंदिरात गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत दररोज सायंकाळी महिलांनी एकत्र येत रामरक्षा व मारोती स्तोत्राचे भक्तिभावाने पठण केले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभात फेरी काढून उत्सवाची सुरुवात करण्यात आली. या आठवडाभर चाललेल्या धार्मिक उपक्रमात संस्कृत भारतीच्या महिला वक्त्यांचे प्रेरणादायी उद्बोधनही आयोजित करण्यात आले.रामनवमीच्या दिवशी रामभक्तीपर गीते सादर करण्यात आली.Indraprastha Nagar रामजन्माचा पाळणा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता प्रसाद वितरणाने करण्यात आली.या संपूर्ण उपक्रमाचे श्रेय नगरातील महिला वर्गाला जाते.अनघा दीक्षित,. जगदाळे, कावरे, . कोनेर, देशपांडे, सावदे, कुरूमकर आदींनी या आयोजनात विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य:अशोक देशपांडे ,संपर्क मित्र