इराणने चक्क क्षेपणास्त्रावर लिहिले ‘थँक्यू इंडिया’!

27 Mar 2026 21:07:49
तेहरान
Iran missile इराण आणि इस्रायलमधील युद्ध अजूनही शांत झालेले नाही. शुक्रवारी देखील दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले चढवले. इराणने इस्रायलवर ८३ व्यांदा क्षेपणास्त्र हल्ला केला. यावेळी पाठवण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांवर ‘धन्यवाद भारत’ असा मजकूर लिहिलेला होता.
 
iran war 
Iran missile समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या व्हिडिओंमध्ये, इराणी सैनिक या क्षेपणास्त्रांवर ‘धन्यवाद, भारतातील जनता‘ असे लिहिलेले दिसून आले. त्याचप्रमाणे, स्पेन, पाकिस्तान आणि जर्मनी या देशांसाठीही संदेश कोरण्यात आले होते. ज्या राष्ट—ांनी इराणला पाठिंबा दिला आहे, त्या राष्ट—ांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या कृतीमागील उद्देश असल्याचे इराणने स्पष्ट केले.
इराणच्या ’रिव्होल्युशनरी गार्ड’च्या माहितीनुसार, हा ८३ वा हल्ला होता; ज्यामध्ये दीर्घ- आणि मध्यम-पल्ल्याची क्षेपणास्त्रे, तसेच ड्रोनचा वापर करण्यात आला.
Iran missile या हल्ल्यांमध्ये केवळ इस्रायलमधील ठिकाणेच नव्हे, तर आखाती प्रदेशात स्थित अमेरिकेच्या लष्करी तळांनाही लक्ष्य करण्यात आले. ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण प्रणालीशी संबंधित, बहरीनमधील एका तळावर हल्ला करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0