एलपीजीच्या तुटवड्यामुळे औद्योगिक कामकाजावर परिणाम

27 Mar 2026 21:51:21
नागपूर,
lpg-shortage : एलपीजीच्या तुटवड्यामुळे औद्योगिक कामकाजावर गंभीर परिणाम होत असताना एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनने तत्काळ आणि दीर्घकालीन उपायांवर चर्चा करण्यासाठी एचसीजी नागपूर प्रा. लि. आणि बाधित औद्योगिक युनिट्सच्या अधिकार्‍यांसोबत बैठक औद्योगिक सदस्यांनी पुरवठ्यातील गंभीर अडचणींवर प्रकाश टाकला. ज्यामुळे उत्पादनात घट, अंशतः कामकाज बंद आणि काही प्रकरणांमध्ये उद्योग बंद पडले आहेत.
 
 

cng-meeting 
 
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधणार्‍या उद्योगांना एमआयएमार्फत समन्वय साधण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण, ही समस्या विविध स्तरांवर कायम आहे. एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष पी. मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार एचसीजी प्रा. लि. आवश्यक औपचारिकता वेळेवर पूर्ण करण्याच्या अधीन राहून, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनने २०-२५ दिवसांत एमआयडीसी क्षेत्रात सीएनजी पुरवठा स्थापित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. एमआयएने सर्व बाधित उद्योगांना मागील सहा महिन्यांच्या अनिवार्य एलपीजी गरजा सादर करण्याचे आवाहन केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0