मुंबई
heavy rainfall राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णतेमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात सलग पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. सततच्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि कांद्यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारकडून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, पण शेतकऱ्यांची प्रतीक्षा अजूनही सुरू आहे.महाराष्ट्रात पुढील ३-४ दिवस (३१ मार्च २०२६ पर्यंत) अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वारे (ताशी ३०-४० किमी वेग) आणि विजांसह पाऊस पडू शकतो
भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यभर पावसाचा मोठा इशारा दिला आहे. मार्च महिना संपत आला असतानाही पाऊस थांबत नसल्याने पुढील काही दिवस अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेषतः नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, सोलापूर आणि सांगली या भागात आज वादळीऱ्यासह पावसाची शक्यता आहे, तर सोमवारपासून पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोकणात heavy rainfall उष्णता वाढल्याचे वातावरण शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे. आज दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान पारा उंच गेला असून उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावात गारपीटीमुळे द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले आहे. एक शेतकरी सांगतो, “आम्ही ७ एकरात द्राक्षबाग केली होती. त्यातून ५० ते ६० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते, पण आता सर्व पिके नष्ट झाली आहेत. सरकारने तात्काळ मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे.” त्याचप्रमाणे चांदवड शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने विजा, मेघगर्जना आणि वाऱ्यासह झोडपून टाकल्याने काढणीस आलेले पिक पूर्णपणे खराब झाले.शेतकऱ्यांच्या या संकटामुळे राज्यातील हवामान बदलाचे गंभीर परिणाम स्पष्ट होत असून, आगामी दिवसांत पावसाच्या तीव्रतेवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.