मनपा विषय समित्यांवर महायुतीचे वर्चस्व

27 Mar 2026 21:31:59
अमरावती, 
municipal-subject-committees : महापालिकेच्या विषय समिती सभापतीची निवडणूक शुक्रवार, २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात घेण्यात आली. सत्ताधारी महायुतीचे बहुमत असल्याने निवडणूक अविरोध झाली. सर्व समित्यांवर सत्ताधारी महायुतीने वर्चस्व स्थापित केले.
 
 
k
 
विधी समिती सभापतीपदी शिवसेनेच्या स्नेहा आशिष लुल्ला व उपसभापतीपदी भाजपाच्या डॉ. मधुरा मिलिंद कहाळे, शहर सुधार समिती सभापतीपदी भाजपाच्या राधा राजू कुरील व उपसभापतीपदी युवा स्वाभिमानच्या सुमती विजय ढोके, माध्यमिक पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिती सभापतीपदी युवा स्वाभिमानच्या अ‍ॅड. प्रीती हर्षल रेवणे व उपसभापतीपदी भाजपाच्या वंदना प्रदीप मडघे, महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ममता संदीप आवारे व उपसभापतीपदी भाजपाच्या लता रावसाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली.
 
 
या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी काम पाहिले. त्यांनी विषय समिती सभापतींचे नियुक्ती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. स्नेहा लुल्ला, डॉ. मधुरा कहाळे, राधा कुरील, सुमती ढोके, अ‍ॅड. प्रीती रेवणे, वंदना मडघे, ममता आवारे, लता देशमुख यांची निवड झाल्याबद्दल महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, नगरसेवक व नगरसेविका यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Powered By Sangraha 9.0