गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

27 Mar 2026 11:21:10
नागपूर,
Meritorious students ग्रामपंचायत भारकस येथे नवोदय विद्यालय तसेच एन.एम.एम.एस. प्रवेश परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. सोहळ्याचे उद्घाटन विनायक महामुनी, मुख्य कार्यपालक अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या उपस्थितीत करण्यात आले. नवोदय परीक्षा पात्र झालेल्या कौतिका गणेश मसराम यांना त्यांच्या कुटुंबासह सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि रु. ११,००० चे रोख पारितोषिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विनायक महामुनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच प्रवेश परीक्षा पास झालेल्या सोळा विद्यार्थ्यांचा आणि एन.एम.एम.एस. परीक्षा पास झालेल्या दहा विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
 
Meritorious students
 
सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतने केलेल्या विविध कामांचे मुख्य कार्यपालक अधिकारी यांनी कौतुक केले. Meritorious students त्यांनी सांगितले की, हे अभियान लोकाभिमुख होण्यासाठी मर्यादित न राहता, राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये अशा प्रकारचे आदर्श उपक्रम राबवले जावेत. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर संस्कारक्षम व्हावे, हा संदेशही त्यांनी दिला.
 
सरपंच रोशनी आतिश उमरे यांनी आपल्या प्रास्ताविकात महिला सक्षमीकरण, बचत गट, युवक मंडळ, शेतकरी व लघुउद्योग यांना अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. Meritorious students अभियानाच्या यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी संदीप गोडसेल यांच्या प्रयत्नशीलतेचे विशेष कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आणि गावाच्या विकासासाठी उपसरपंच अतुल गावंडे, ग्रामपंचायत सदस्य तसेच विरोधी पक्ष नेते अतिश उमरे यांचेही कौतुक झाले.
 
शाळेच्या पटसंख्येत होणारी लक्षणीय वाढ आणि गुणवत्ता याबद्दल विनायक महामुनी यांनी समाधान व्यक्त केले. सोहळ्याचे विशेष अतिथी आणि उपस्थितींमध्ये उद्घाटक विनायक महामुनी, अध्यक्ष सरपंच रोशनी आतिश उमरे, गटविकास अधिकारी संदीप गोडसेल, गटशिक्षणाधिकारी ज्योत्स्ना हरडे, उपसरपंच अतुल गावंडे, ग्रामपंचायत सदस्य धीरज गायकवाड, सुरेंद्र गायकवाड, शोभा भिसे, राखी खडसे, सारिका बुलकुंडे, राधा सोयाम, कुसुम उईके, सपना गायकवाड, शुभम लाकडे, Meritorious students महादेव भूषण निखाडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक बाराहाते, विस्तार अधिकारी लीलाधर चरपे, केंद्रप्रमुख राजकुमार पचारे, मुख्याध्यापक व शिक्षक शेख सर, आष्टणकर, इखार नखाते, राजेश देवगडे, रोशनी काशीकर, फुल पाटील तसेच गावातील नागरिक, महिला, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी काशीकर, तर आभार प्रदर्शन राजेश देवगडे यांनी केले.
सौजन्य: उज्वल रोकडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0