असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल्सची बैठक

    दिनांक :27-Mar-2026
Total Views |
‘नागपूर हेल्थ व्हिजन २०३०’ला मंजुरी

नागपूर, 
‘Nagpur Health Vision 2030’ असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल्स, नागपूरची महत्त्वपूर्ण कार्यकारिणी बैठक नुकतीच महालमधील संघ हॉस्पिटलमध्ये झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष कांचन नितीन गडकरी होत्या. नागपूरमधील सुमारे २० चॅरिटेबल हॉस्पिटल्सचे कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी मोठ्या सं‘येने उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने चॅरिटेबल हॉस्पिटल्सना भेडसावणार्‍या समस्या व भविष्यातील आरोग्य नियोजनावर सविस्तर मंथन करण्यात आले.
 
 
ACH dksl
 
या बैठकीत गरीब रुग्ण योजना, मालमत्ता कर, पाणी व वीज प्रश्न व जीएसटी संबंधित तांत्रिक अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चॅरिटेबल हॉस्पिटल्सचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित मंत्र्यांची भेट घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. यापूर्वी राज्यमंत्री अ‍ॅड. आशीष जयस्वाल यांच्या माध्यमातून शासनाकडे सादर केलेल्या निवेदनांचा पाठपुरावा करण्यासाठी ही भेट घेतली जाणार आहे. असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास शेंडे यांनी ‘नागपूर हेल्थ व्हिजन २०३०’ हा धोरणात्मक आराखडा सादर केला. या आराखड्यांतर्गत विविध भागधारकांच्या सहकार्याने चॅरिटेबल हॉस्पिटल्सचे बळकटीकरण व पुनर्विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 
 
 
‘Nagpur Health Vision 2030’ नागपूर शहराचा आरोग्य दर्जा, स्वच्छता आणि वायू प्रदूषण निर्देशांक राष्ट्रीय मानकांनुसार सुधारण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत कळीचा ठरणार असून, सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली. याशिवाय, बैठकीत आगामी २०२६-२७ या आर्थिक अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. संस्थेचे कार्य अधिक पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ विकसित करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी नागपूर विभागात विविध आरोग्य उपक‘म राबविण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. या उपाध्यक्ष डॉ. सुनीता विकास महात्मे, सरचिटणीस जगदीश गुप्ता, खजिनदार अ‍ॅड. पी. घाटोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.