बीड
Pankaja Munde राजकारण संपल्यानंतर मी सुद्धा हरिभक्त पारायणाकडे जाणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले.गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरु देणार नाही, मी ही शपथ चितेवर खाल्ली आहे. गोपीनाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले आणि तुमच्या पायात घातले तरी ही फेड होणार नाही,असे भावनिक भाषण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडच्या भायाळा गावात आयोजित नारळी सप्ताहात केले. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे या बीड दौऱ्यावर होत्या. दिवसभरात श्रीराम नवमी उत्सवाच्या कार्यक्रमात सहभाग घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात गणेशानंद गडाच्या नारळी सप्ताहास भेट देत भावनिक भाषण केले. यावेळी त्या बोलत होत्या.
तर सगळे प्रेमाने राहा Pankaja Munde एकजुटीने राहा एकमेकांचा हात धरून रहा, असे आवाहन उपस्थित भाविकांना पंकजा मुंडेंनी केलं. या नारळी सप्ताह निमित्त दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडेंची भावनिक साद दिसून आली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला मिळणे, हे माझे मोठे भाग्य आहे. रामनवमीचा हा सण आपल्याला सत्याच्या आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. ज्याप्रमाणे प्रभू रामाने आदर्श राज्यकारभार केला, तसेच रामराज्य परळीतही अवतरावे, हीच माझी प्रभू चरणी प्रार्थना आहे.लोकसभा पराभव झाल्यानंतर माझ्या भावांनी आत्महत्या केल्या. इतके प्रेम तुम्ही मला दिले . अशी प्रतिक्रिया हि मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.