पोलिसांमुळे आत्मदहनाचा प्रयत्न निष्फळ

27 Mar 2026 21:34:25
दर्यापूर, 
police-foil-self-immolation-attempt : दर्यापूर पोलिस ठाण्याच्या आवारात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रत्यन पोलिसांच्या सतर्कतेमुळे निष्फळ झाला. आरोपीसह त्याच्या पत्नीला तब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. सदर प्रकार शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला.
 
 
police-foil-self-immolation-attempt
 
 
 
दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील रामगाव येथे रामभाऊ भगवान झिपरकर यांची गत १२ मे रोजी आरोपींनी एकत्रितपणे संगनमत करून हत्या केल्याची तक्रार सारिका संजय झिपरकर यांनी खल्लार पोलिस ठाण्यात त्याच दिवशी दिली होती. सदर तक्रारीवरून आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या गुन्ह्याच्या तपासात खल्लारचे ठाणेदार रवींद्र बारड यांनी आरोपींसोबत हातमिळवणी करून तपासात सुरवातीपासूनच हलगर्जीपणा केलाख असा गंभीर आरोप मृतक रामभाऊ झिपरकर यांची सून सारिका संजय झिपरकर यांनी केला होता. अटक केल्यानंतर पहिल्याच दिवशी ९ आरोपींची न्यायालयीन कोठडीची मागणी केली तसेच तक्रारीमध्ये सुद्धा काही बाबी आरोपींना पुरक होतील अशा नमूद केल्या, या उल्लेखाची तक्रार सारिका झिपरकर यांनी २१ मे रोजी केली होती.
 
 
परंतु त्या तक्रारीबाबत गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. त्या नंतरच्या तक्रारीचीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे दर्यापूर पोलिस ठाण्यासमोर खल्लार पोलिसांच्या विरोधात आत्मदहन करण्यााचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान तक्रारदार सारिका संजय झिपरकर व पती संजय रामभाऊ झिपरकर यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र दर्यापूर पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले.
Powered By Sangraha 9.0