लोककल्याण समितीचा सेवासंवेद प्रकाशना समारंभ

27 Mar 2026 11:41:59
नागपूर,
Public Welfare Committees Service राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, लोककल्याण समितीचे द्वैमासिक वार्तापत्र सेवासंवेद या छापील आवृत्तीचे विमोचन रेशिमबागेतील मधूकर भवन सभागृहात विदर्भ प्रांत संघचालक मा. दिपकजी तामशेट्टीवार यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसमस्या निवारण व लोककल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता होते, तर सचिव माधवराव उराडे व्यासपीठावर उपस्थित होते.
 
Public Welfare Committees Service
 
पूर्वी सेवासंवेद द्वैमासिक ई-मॅगझिन स्वरूपात प्रकाशित होत असे. विदर्भ प्रांतातील लोककल्याण समितीत अनेक सेवाभावी प्रकल्प कार्यरत असून, त्या सेवा कार्याची माहिती कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हे द्वैमासिक छापील स्वरूपात प्रकाशित करण्याचा मानस कार्यकारी मंडळाचा होता. Public Welfare Committees Service आजच्या प्रकाशना समारंभाद्वारे या कार्याचा श्रीगणेशा करण्यात आला.
 
प्रकाशना समारंभाला विदर्भ प्रांत कार्यवाह प्रा. अतुलजी मोघे, प्रांत प्रचारक गणेशजी शेट्ये, धनंजय वैद्य, संपादक संजय वासुदेव कठाळे, रविंद्र गोविंद पांडे, तसेच मुखपृष्ठ व अंतर्गत सजावट करणारे प्रमोद कुलकर्णी उपस्थित होते. याशिवाय सेवा भारती व लोककल्याण समितीचे सदस्य संजय जोगळेकर आदी मान्यवर देखील उपस्थित होते. Public Welfare Committees Service संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय हरदास यांनी केले आणि सुखमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य: संजय कठाळे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0