मन मंथन संस्थेचा रामगीत गायन कार्यक्रम

27 Mar 2026 11:55:51
नागपूर,
Man Manthan Sanstha मन मंथन साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थेतर्फे राम नवमीच्या पूर्वसंध्येला रामाच्या गीतांचा आणि भजनांचा कार्यक्रम ऑनलाइन गुगल मीट वर आयोजित करण्यात आला. कार्यक्रम संस्थापिका प्रेरणावाडी यांच्या संकल्पनेतून साकार झाला. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. नंदिनी खाडे आणि वैशाली जोशी यांनी केले, तर तांत्रिक बाजू कोषाध्यक्ष प्रीती दीक्षित यांनी सांभाळली.
 
Man Manthan Sanstha
 
नागपूर, हिंगणघाट, यवतमाळ, पुणे, सातारा, कल्याण, ठाणे, मुंबई इत्यादी ठिकाणाहून सुमारे ४०-४५ जणांचा सहभाग होता. या कार्यक्रमात रामावर आधारित भजने, गीते, कव्वाली, स्वरचित गीते, बंदिश, चित्रपट गीते अशा विविध प्रकारच्या गायनाचा समावेश झाला. Man Manthan Sanstha पुण्याहून आलेल्या बालकलाकारांनी, अर्णव कुलकर्णी आणि अनय पांडे, रामगीत आणि रामरक्षा स्तोत्र गायून आपला सहभाग नोंदवला.
 
सर्वप्रथम सचिव सौमंजुषा विश्वेकर यांनी राम पंथान पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ केला, तर आभार प्रदर्शन मंजुषा विश्वेकर यांनी केले. Man Manthan Sanstha संस्थेच्या अध्यक्ष आणि सर्व सभासदांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेहनत घेतली आणि त्याचा उत्साहवर्धक सहभाग नोंदवला.
सौजन्य: रतिका काशीमकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0