स्नॅपचॅटवरील मित्राने केला बलात्कार

27 Mar 2026 14:19:22
अनिल कांबळे
नागपूर,
साेशल मिडीयावरुन ओळखी झाल्यानंतर प्रेमप्रकरण आणि त्यानंतर लैंगिक शाेषण केल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. अशाच प्रकारे एका प्रकरणात एका बारावीच्या विद्यार्थिनीला स्नॅपचॅटवर ओळखी झालेल्या युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढळे. तिला वेगवेगळे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. सम्यक (24, कपीलनगर) असे आराेपीचे नाव आहे. कपीलनगरात राहणारी 17 वर्षीय तरुणी स्नेहा (काल्पनिक नाव) ही बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. तिला स्नॅपचॅटवर रिल्स टाकणे आणि ाेटाे काढण्याचा छंद आहे. तिच्या काही व्हिडिओला सम्यक हा गेल्या काही दिवसांपासून ाॅलाे करीत हाेता. स्नेहाच्या प्रत्येक ाेटाेला लाईक आणि स्वतःच्या व्हाॅट्सअपवर शेअर करीत हाेता.
 
 

chat 
 
त्यामुळे स्नेहाने त्याला ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दाेघांची काही दिवस स्नॅपचॅटवर चॅटिंग सुरु झाली. ऑगस्ट 2025 मध्ये दाेघांनी एकमेकांचे माेबाईल क्रमांक घेतले आणि व्हाॅट्सअपवर चॅटिंग सुरु झाली. काही दिवसांतच दाेघांची मैत्री झाली आणि दाेघांनी भेटायचे ठरविले. 8 सप्टेंबर राेजी सम्यकने तिला आपल्या घरी पार्टीचे आमंत्रण दिले. ती घरी पाेहचल्यानंतर त्याच्या घरात अन्य सदस्य कुणीच नव्हते. दाेघांनी पार्टी केली आणि त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच त्याने बळजबरी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने वारंवार घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. लग्न करण्याचे आमिष देऊन तिला लैगिक शाेषण केले. त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन तिला मारहाण केली. त्यामुळे चिडलेल्या स्नेहाने कपीलनगर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.
 
 
Powered By Sangraha 9.0