जय श्रीरामच्या घोषणांनी आकाश दणाणले!

27 Mar 2026 21:30:44
देवळी,
shri-ram-procession-deoli : शहरातील श्रीराम मंदिर (मगदे) येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. जन्मोत्सवाची सुरवात काल्याच्या कीर्तनाने झाली १२ वाजताच श्रीराम प्रभूंना पाळण्यात टाकून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी आ. राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, नप उपाध्यक्ष राहुल चोपडा, नगरसेवक विलास जोशी, प्रेमेंद्र ढोक आदींनी रामाचे दर्शन घेतले.
 
 
mjlkj
 
 
 
सायंकाळी शहरातून निघालेल्या श्रीराम शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शोभा यात्रेची सुरवात आ. राजेश बकाने यांनी श्रीराम विराजमान असलेली पालखी खांद्यावर घेऊन केली. तर माजी खासदार रामदास तडस यांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. राधा-कृष्ण मोरनी नृत्य, शिवतांडवाची थरारक प्रस्तुती, खाटूश्याम झांकी, बाहुबली हनुमान, माँ काली माता, श्रीराम दरबार तसेच प्रजापीता ब्रह्मकुमारी द्वारा नवदुर्गा दर्शनाच्या आकर्षक झांयांनी यात्रेला विशेष रंगत आणली. शोभायात्रेचा मार्गावार आकर्षक रांगोळी,भगव्या पताका, फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाईने उजळून निघाला होता.
 
 
शोभायात्रेची सुरुवात श्रीराम मंदिर (मगदे) येथून होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा मंदिरात समारोप करण्यात आला. यात्रेत युवक, महिला, पुरुष तसेच भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यशस्वीतेकरिता श्रीराम उत्सव समितीचे अध्यक्ष तथा नप उपाध्यक्ष राहुल चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सागर कपूर, विवेक नाईक, प्रमोद ढोक, प्रवीण फटिंग, हेमंत जावधिया, श्रीकांत देशपांडे, ज्ञानेश्वर काळे, मंगेश भुंबूर, अक्षय मेलेकर, आकाश गवते यांच्यासह एस. एम. डब्ल्यू. इस्पात प्रा. लि. यांचे सहकार्य लाभले.
Powered By Sangraha 9.0