श्रीराम शोभायात्रेने हिंगणघाट शहर दुमदुमले

27 Mar 2026 21:28:23
हिंगणघाट, 
shri-ram-procession-hinganghat : नव्या वस्तीतील पुरातन श्रीराम मंदिरात सकाळपासूनच भाविकांची अपार गर्दी, जय श्रीरामच्या गगनभेदी घोषणेत भर दुपारच्या उन्हाची पर्वा न करता तरुणापासून तर विविध वयोगटातील स्त्री पुरुषांच्या अफाट उत्साहात श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
 
 
hgt
 
 
 
सकाळी युवकांची बाईक रॅली, दुपारी १२ वाजता मुख्य राममंदिरात आ. समीर कुणावार, अ‍ॅड. सुधीर कोठारी, नप अध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, डॉ. मधुसुदन गोयंका यांच्या उपस्थितीत राम जन्माचा सोहळा झाला. श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा उत्सव समितीद्वारे सायंकाळी सुरू झालेल्या शोभायात्रेने संपूर्ण शहर राममय झालेले होते. टाळ, मृदंग, भजन, विविध गावाहून आलेले बॅण्ड पथक व डीजेच्या गगनभेदी आवाजावर रामनामच्या जयघोषात नाचणारी तरुणाईने वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. शोभायात्रेत आंध्रप्रदेशातील कांताराम झाकी, बांबू कथक झाकी, गिमा टेसटाईल्स, डांगरी वॉर्ड मित्र परिवार, तेलीपुरा आखाडा जुनी वस्ती, गाडगेबाबा मित्र परिवार, संत तुकडोजी वॉर्ड मित्र परिवार आदी चलदृष्याच्या आकर्षक दृष्य रसिकाचे लक्ष वेधून घेत होत्या.
 
 
 
शोभायात्रेच्या यशस्वीते साठी आकाश पुरोहित, सिद्धांत चव्हाण, हरीश नेरलवार, वरून भोला, पंकज देवढे, जतीन ठाकूर, अथर्व नक्षीने, नितीन येसनसुरे, अर्थव द्विवेदी, प्राजक्त सावरकर, मयंक चौधरी, नवनीत पुरोहित, हिताशू चांगलं, आदर्श द्विवेदी, दीपक चांगलं इत्यादी असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0