नागपूर ,
Sindhi Hindi Education Committee सिंधी हिंदी विद्या समितीचे संस्थापक स्वर्गीय दादा रामचंद बाखरू यांची जन्मशताब्दी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरच्या अश्वघोष हॉलमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.२७ शैक्षणिक संस्थांचा विस्तार असलेल्या समितीच्या वतीने हा सोहळा आदरपूर्वक साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून डॉ. वेदप्रकाश मिश्रा उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी डॉ. आय. पी. केसवानी होते. यावेळी विनोद मसंद, डॉ. विंकी रुघवानी, नीरज बाखरू, मोहन जोतवानी, संजय महाकाळकर, सुरेश जग्यासी आदी मान्यवर उपस्थित होते.अमित बाखरू यांनी संस्थापकांविषयी आठवणी सांगितल्या, तर डॉ. विंकी रुघवानी यांनी त्यांच्या शिस्तीवर प्रकाश टाकला. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी बाखरू यांना ‘कर्मयोगी’ व ‘शिक्षण महर्षी’ असे संबोधत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी बाखरू यांच्या जीवनावरील चित्रमय कालक्रमाचे अनावरण करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १० हजार रुपयांच्या पारितोषिकाची घोषणा करण्यात आली आणि नवीन बोधचिन्हाचेही अनावरण करण्यात आले.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे बाखरू यांचा एआय जनित संदेश ठरला. Sindhi Hindi Education Committee छाया वानखेडे व आकांक्षा नगरकर यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाने कार्यक्रम रंगला.आभार प्रदर्शन नीरज बाखरू यांनी केले, तर संचालन विजय विधानी व लक्ष्मी मोझरकर यांनी केले.
सौजन्य:मिलिंद शिनखेडे,संपर्क मित्र