वर्धा,
rahul-kalantri : शेअर बाजार हा असा बाजार आहे जिथे तुम्हाला चावी मिळाली की कुलूप बदलते, असे मत मेहता इक्विटीज लिमिटेडच्या कमोडिटीज डेस्कचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री यांनी व्यत केले.
येथील माहेश्वरी युथ लबने आयोजित केलेल्या व्याख्यानात शेअर बाजारातील अस्थिरतेवर ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर महेश्वरी नवयुवक मंडळाचे अध्यक्ष ऋषभ जाजू, व महेश्वरी मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर भुताडा उपस्थित होते.
कलंत्री पुढे म्हणाले, मागणी आणि पुरवठ्याच्या तत्त्वावर चालणार्या या बाजारात संयम हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. देवी लक्ष्मी त्यांचे पाय चोळत असताना, शेषशैयावर विश्राम करीत असलेल्या भगवान विष्णूंचे चित्र दाखवत ते म्हणाले की, जगात प्रत्येक क्षणी घडणार्या घटनांची त्यांना जाणीव असते. असे असूनही, ते मानेखाली हात ठेवून, सर्वांचे ऐकत शांत आणि संयमी राहतात.
त्याचप्रमाणे, प्रत्येक क्षणी घडणार्या घटनांमुळे अस्थिर झालेल्या शेअर बाजारावरील आपले नियंत्रण सुटता कामा नये. तुमच्या लाखो-कोटींच्या नुकसानीसाठी शेअर बाजार जबाबदार नाही तर तुम्ही स्वतः अनेकदा करत असलेल्या छोट्या चुका जबाबदार असुन शकतात असे ते म्हणाले. शेअर बाजार हा कोणत्याही विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे! माहिती क्रांतीमुळे तो आता केवळ श्रीमंतांसाठीच नव्हे तर सामान्य माणसासाठीही सहज उपलब्ध आहे. ज्यांना एखाद्या विशिष्ट कामाबद्दल खात्री आहे, त्यांनाच ते काम करण्याची परवानगी दिली पाहिजे. त्याचप्रमाणे शेअर बाजाराबद्दलची माहिती नेहमी तुमच्या आर्थिक सल्लागाराकडून घेतली पाहिजे, असेही राहुल कलंत्री म्हणाले. संचालन मोहित चांडक यांनी केले. राजकुमार जाजू यांनी आभार मानले.